बुधवार, 24 मार्च 2010







सर्न चे अद्भुत विश्व !
प्रशांत पोळ, जबलपुर
सर्न हे नाव कानांवर पडले ते डेन ब्राऊन च्या कृपेने. म्हणजे त्यालाही आता २ वर्षे झालीत. 'एन्जेल्स एंड डेमंस' मध्ये सर्न चा उल्लेख प्रामुख्याने आहे. 'एन्जेल्स एंड डेमंस' ही जगप्रसिद्ध कादंबरी. आणि त्यावर चित्रपट बनल्यामुळे अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आलेली. थरारक आणि मेंदूला भरपूर खाद्य पुरवणारी! अर्थात डेन ब्राऊन चं वैशिष्ठ्य म्हणजे तो सत्य आणि कल्पित यांची इतकी बेमालून सरमिसळ करतो की त्याच्या पुस्तकातलं सारे खरच वाटू लागते!

एन्जेल्स एंड डेमंस मध्ये मी एका जागी अडखळलो होतो. डेन ब्राऊन ने म्हटले होते की इंटरनेट चा (वर्ल्ड वाईड वेब) चा शोध हा मुळात सर्न मध्ये लागला. मला ही माहिती नवी होती. इतरांप्रमाणे मी देखील समजत होतो की अमेरिकन सुरक्षा दलाने आर्पानेट (ARPANET) च्या माध्यमातून इंटरनेट शोधून काढले. अर्थात नंतर लक्षात आले की डेन ब्राऊन ने लिहिलेले खरे आहे. सर्न च्या वैज्ञानिकांनी जगातील पहिले वर्ल्ड वाईड वेब (www) तयार केले आहे, ज्याला पुढील वर्षी २० वर्षे पूर्ण होत आहेत. आणि मग मला या सर्न बद्दल कुतूहल वाटायला लागले.

दरम्यान वर्ष भरा पूर्वी 'बिग बॅंग' च्या प्रयोगामुळे सर्न चे नाव जगभर गाजायला लागले. आपल्या पृथ्वीच्या उत्पत्तीचा शोध घेणारा क्रांतीकारी प्रयोग असं त्याचं वर्णन होऊ लागलं. या 'बिग बॅंग' च्या प्रयोगा विषयी डेन ब्राऊन ने 'एन्जेल्स एंड डेमंस' मध्ये थोडं फार लिहिलंय.

हे सर्व बघत असताना सर्न विषयी चे कुतूहल बळावत चालले होते. सर्न ने २७ किलोमीटर लांबीचे जमिनीच्या आत खोलवर तयार केलेले भुयार, त्यांचा तो एनटीमेटर चा प्रयोग वगैरे बरंच काही. . .! आणि म्हणूनच जिनेवा ला जायचं ठरलं तेंव्हा माझी प्राथमिकता होती, सर्न !

0 0 0 0 0

सर्न म्हणजे फ्रेंच भाषेत 'युरोपिअन लोकांची परमाणु विज्ञाना वरची प्रयोगशाळा'. पूर्वी याच्या पूर्ण नावाचं संक्षिप्त स्वरूप CERN (Counseil Europeen pour la Recherche Nucle’aire) असे फ्रेंच मध्ये होते. कालांतराने ते बदलले अन झाले – ‘Organization Europeene pour la Recherche Nucle’aire’ (थोडक्यात OERN). मात्र सर्न च्या संचालकांनी त्याचं लोकप्रिय नाव सर्न (CERN) हेच कायम ठेवलं !

२९ सप्टेंबर १९५४ मध्ये सर्न ची स्थापना झाली ती भौतिक शास्त्रात काहीतरी भव्य / दिव्य करण्यासाठी. 'विश्वाच्या उत्पत्तीचा शोध' वगैरे हेतू पूर्वी नव्हतेच. पश्चिम युरोपातील ११ देशांनी एकत्र येऊन या देशांतील ‘भौतिकी शास्त्रज्ञांना युरोपातच ठेवण्यासाठी’ या प्रयोग शाळेची स्थापना केली. प्रारंभिक उद्देश हा भौतिकी व परमाणु विज्ञानाचा उपयोग संहारक म्हणून न करता, विधायक स्वरूपात करण्यासाठी होता.

दुसरे विश्व युद्ध नुकतेच संपलेले होते. या युद्धाने परमाणु शक्तीचे अत्यंत विध्वंसक असे रूप बघितले होते. तसेच युरोपातच झालेली वेगवेगळ्या देशांमधील यादवी ही बघितली होती.

या दोन्हींचे परिणाम पुसून काढण्यासाठी, म्हणजे परमाणु शक्तीचे विधायक रूप जगासमोर ठेवण्यासाठी 'सर्न' हे फार मोठे माध्यम होते.

आज १८ युरोपिअन युनियन्स च्या देशांसहित २० देशांमध्ये पसरलेले सर्न हे फार मोठे आणि महत्वाचे प्रस्थ झालेले आहे. पार्टिकल फिजिक्स बरोबर इतरही क्षेत्रात सर्न ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जगभरातून डेटा गोळा करून तो सर्न मध्ये प्रोसेस करण्यासाठी त्यांनी उभारलेले नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे 'वाईड एरिया नेटवर्क' आहे! जगभरातून, २० पेक्षा जास्त ठिकाणांवरून सर्न ने ची ‘लीस्ड सर्किटस’ घेतलेली आहेत. २,६०० पूर्णकालिक सदस्यांशिवाय सर्न ला ७,९०० वैज्ञानिकांची मदत मिळतेय, जे जगभर विखुरलेले आहेत. आपल्या मुंबईतल्या 'टाटा इंस्तीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च' (TIFR) ची सर्न ला सक्रीय मदत आहे. जिनेवा तील टेलिकॉम-२००९ च्या प्रदर्शनात, सर्न च्या बूथ वर, त्यांनी TIFR च्या वैज्ञानिकांसोबत 'लाइव कॉन्फरेंस ' दाखवली होती.

0 0 0 0 0

वर्ल्ड वाईड वेब (www) चा शोध सर्न मध्ये लागला हे खरे आहे. 'हायपरटेक्स्ट' या प्रोटोकोल चा वापर करून सर्न च्या वैज्ञानिकांनी सर्वप्रथम १९८९ मध्ये संपर्काचे एक जाळे तयार केले. तेंव्हा 'इंटरनेट' हे सुद्धा प्रचारात नव्हते! सर्न मधला एक वरिष्ठ वैज्ञानिक मला सांगत होता, की वर्ल्ड वाईड वेब तयार करणं ही सर्न ची 'मजबुरी' होती. वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या त्यांच्या वैज्ञानिकांना आपापसात संवाद साधण्यासाठी संपर्काची आवश्यकता होती, जी ह्या www ने पूर्ण केली आणि यातूनच पुढे इंटरनेट साकारले.

आजही सर्न मध्ये एका खोलीच्या बाहेर चकचकीत पॉलिश केलेल्या लाकडी पाटीवर, चकाकत्या पितळेच्या अक्षरात लिहिलेय - 'जगातले पहिले वर्ल्ड वाईड वेब या खोलीत जन्माला आले" !!

0 0 0 0 0 0

पण मुळात सर्न ही पार्टिकल फिजिक्स आणि पर्यायाने परमाणु विज्ञानाचा क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. विस्तीर्ण पसरलेली ही संशोधन संस्था स्वित्झर्लंड आणि फ्रांस या दोन देशांच्या सीमेवर, दोन्हीही देशांत आपले हात पाय पसरून आहे. सर्न च्या भेटीला जायचे असेल, आणि आपली विनंती त्यांनी मान्य केली असेल, तर सर्न तर्फे आपल्याला विविध सूचनांची एक भली मोठी मेल येते. त्यात चप्पल न घालता, जोडे घालण्याच्या आग्रहाबरोबरच आणखी एक आग्रह असतो, तो म्हणजे, पासपोर्ट जवळ बाळगण्याचा आणि फ्रांस चा अधिकृत प्रवेश परवाना असण्याचा. हे यासाठी, कारण सर्न ची ती भलीमोठी प्रयोगशाळा दाखवताना स्विस आणि फ्रेंच अश्या सीमांमध्ये तळ्यात / मळ्यात करायला होत.

अर्थात पूर्वी स्वित्झर्लंड हे राष्ट्र शान्झेन देशांमध्ये शामिल नसल्याने स्वित्झर्लंड साठी वेगळा व्हिसा घ्यायला लागायचा. आता मात्र तसं नाही. स्वित्झर्लंड हे शान्झेन मध्ये शामिल झाले असल्याने फ्रांस साठी वेगळा व्हिसा घेण्याची आवश्यकता नसते.

सर्न बघण्यासाठी पुरेसे आधी बुकिंग करावे लागते. आपल्या प्रत्येक इ-मेल ला सर्न तर्फे तत्परतेने आणि व्यक्तिगत उत्तर येते. सारी माहिती अगदी नीटनेटकी आणि व्यवस्थित. सर्न च्या आत फोटोग्राफी पूर्णपणे मान्य आहे. यातून काही सुरक्षे विषयी प्रश्न निर्माण होऊ शकतो कां? यावर सर्न च्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की आम्ही जे काय करतोय ते जगजाहीर आहे. त्यात कुठेही लपवाछपवी नाही. मग घेतलेत फोटो, तर बिघडले कुठे ?

पण नुकतेच गेल्या आठवड्यात सर्न च्या एका वैज्ञानिकाचा अल-कायदा च्या आफ्रिकेतील गटाशी संबंध असल्याची बातमी आली. फ्रेंच पोलीसांनी ८ ऑक्टोबर ला सर्न च्या ३२ वर्षे वयाच्या शास्त्रज्ञाला अटक केली. या शास्त्रज्ञाचा संबंध अल-कायदा च्या 'इस्लामिक-माघ्रेब' या अल्जिरीयात काम करणाऱ्या टोळीशी होता. या अटकेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. हा संशयित दहशतवादी सर्न च्या महत्वाकांक्षी 'लार्ज हेड्रोन कोलायीडर' (LHC) या प्रकल्पावर काम करत होता. अर्थात सारे जग श्वास रोखून या प्रयोगाकडे बघत आहे. त्यात या दहशतवाद्यांनी काही घातपाताचे प्रकार करून ठेवले आहेत कां ? ही चिंता अनेकांना आहे.

अर्थात सर्न तर्फे असं स्पष्टीकरण दिल्या गेलं आहे की संशयित आरोपी हा बाहेरील प्रयोगांवर काम करत होता. त्यामुळे घातपात करण्यासारखी माहिती त्याला मिळूच शकलेली नाही.

0 0 0 0

जमिनीच्या आत तर सर्न पसरलेले आहेच, पण जमिनीवरचा सर्न चा पसाराही भला मोठा आहे. सध्या सर्न चे रिसेप्शन सेंटर एका बैठ्या इमारतीत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून एक भला मोठा गोल डोम बांधण्याच काम चालू आहे. डेन ब्राऊन ने लिहिल्याप्रमाणे सर्न जवळ सुपर सोनिक जेट नाही, की स्वतःचे विमानतळही नाही. मात्र डोळ्यांची बायोमेट्रिक तपासणी वगैरे सर्व पुस्तकातल्या सारखंच आहे.

रिसेप्शन सेंटर मध्ये डाव्या हाताला आत तळघरात सर्न चे संग्रहालय आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते अक्षरशः जिवंत झाले आहे. सर्न न बघता, नुसते संग्रहालय बघता आले तरी भौतिक शास्त्रातली, खगोल शास्त्रातली बरीच माहिती मिळते.

रिसेप्शन सेंटर मधून आपल्याला चालत सर्न च्या मुख्य प्रयोगशाळेकडे नेतात. हा साधारण अर्ध्या किलोमीटर चा रस्ता आहे. या मुख्य प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रयोगांची सविस्तर माहिती दिली जाते. पूर्वी वापरलेले 'पार्टिकल अक्सिलीरेटर' सुद्द्धा दाखवतात. ‘सुपर कंडक्टर’ (ज्यात गतिरोध किंवा रेझीस्टेन्स मुळीच नसतो) आपल्याला हाताळू देतात. इथेच जमिनीखाली प्रयोग बघण्यासाठी जाण्याची व्यवस्था आहे.

0 0 0 0

सर्न दाखवायला जी व्यक्ती नेमलेली असते, ती स्वतः या प्रयोगाच्या टीम ची सदस्य असते. त्यामुळे त्याचं सांगण म्हणजे गाईड सारखी पोपटपंची नसून विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी ती एक पर्वणीच असते.

सर्न बघून आल्यावर आपण परत रिसेप्शन सेंटर मध्ये आलो की सर्न च्या भेटवस्तूंचं एक दालन आहे. सर्न चा लोगो असलेले ते शर्टस, केप्स, विंड चीटर्स, बेग्स इत्यादी तेथे असतात. आणि लोकं ही ती भराभर घेत असतात.

मात्र त्या भेटीबरोबर मनात रेंगाळत राहतो तो सर्न मधला अगदी आगळा वेगळा अनुभव! एका नव्याच विश्वाची सफर. विज्ञानाच्या गरुडझेपेचा तो पल्ला बघून आपण नतमस्तक झालेले असतो, ट्रान्स मध्ये गेलेलो असतो, सर्न च्या आठवणी साठवत !



काही महत्वाच्या नोंदी (Box Items)

प्रयोगाला कोणी 'सेबोटेज' करतोय. .?

सर्न चा महत्वाकांक्षी प्रयोग हा पुढे पुढेच सरकतोय. मुळात २००६ मध्ये करायचे असे ठरलेला प्रयोग गेली चार वर्षे होऊ शकलेला नाहीये. गेल्या वर्षी सार काही जुळून आलं होत. साऱ्या जगभर चर्चेला उधाण आलं होत. पण LHC मधील दोन चुम्बाकांमध्ये लहानसा स्फोट झाला. तसा हा लहानच होता, त्यामुळे आटोक्यात येऊ शकणारा होता. पण त्यामुळे जमिनीच्या आत असलेल्या २७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या च्या एका भागात उष्णता निर्माण झाली. 'बिग बॅंग' च्या प्रयोगामुळे किती उष्णता निर्माण होते ? सर्न चा शास्त्रज्ञ सांगत होता, सूर्यावरील उष्णतेच्या १०० कोटी पट. अर्थात ही अक्षरशः क्षणभरच असते. मात्र या उष्णतेमुळे, ती रोखण्याची यंत्रणा ताबडतोप कार्यान्वित झाली. हिलीयम वायू मोकळा झाला. पण त्यामुळे एक लहानशी अडचण उद्भवली. त्या पाईप मध्ये उणे तापमान निर्माण झाले. अर्थात आत घट्ट बर्फ तयार झाला.तो मोकळा करायला शास्त्रज्ञांना चार दिवस लागले !

या ऑक्टोबर मध्ये त्यांच्या एका शास्त्रज्ञाला दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झाली, तर तीन नोव्हेंबरला LHC च्या सेक्टर ८१ मधील सुपरकुल्ड चुंबक अचानक गरम होऊ लागले.. शास्त्रज्ञ जेंव्हा या प्रकारची उकल करण्यास धावले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की शोर्ट सर्किट होऊन त्या भागातली वीज गेलेली होती. ही वीज कशामुळे गेली होती ? एक फारच भन्नाट गोष्ट घडली. जिनेवा च्या बाहेर असलेल्या एका विद्युत सब-स्टेशन च्या वर उडणार्या पक्ष्याने त्या सब-स्टेशन च्या एका उघड्या तारेवर आपली विष्ठा टाकली आणि शोर्ट सर्किट झाले! सर्न च्या 'माईक लेमोंट' या प्रवक्त्याने तरी हेच कारण सांगितलेय. पटतेय तुम्हाला ?

जगातल्या दोन टोकांना असलेल्या दोन भौतिकी शास्त्रज्ञांना मात्र हे पटत नाहीये. कोपेंहेगन च्या नील बोर इंस्तीट्युट मधला 'बीच नेल्सन' आणि जपान च्या क्योतो मधील युकावा इंस्तीट्युट ऑफ थिओरेटीकल फिजिक्स मधल्या 'मासाव निनोमिया' यांनी एक वेगळीच 'थिअरी' मांडलीय. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे तो पक्षी हा 'टाईम - ट्रेव्हलिंग बर्ड' असून भविष्यातल्या काही शक्तींनी हा प्रयोग रोखण्यासाठी तो मुद्दाम पाठवलाय! गंमत म्हणजे ह्या 'थिअरी' ला गंभीरतेने घेत अमेरिकेच्या 'टाईम' ह्या साप्ताहिकाने आपल्या नोव्हेंबर च्या एका अंकात चक्क पानभर हे सार काही छापलंय! एकुणात सर्न पुढील काही दिवस तरी धमाल उडवणार हे निश्चित !!
वर्ल्ड वाईड वेब ची वीस वर्षे !

१९९० हे वर्ष अनेक अर्थांनी क्रांतिकारक ठरलेलं आहे. अनेक वर्षांचे शीत युद्ध, बर्लिन च्या भिंतीच्या पडण्यामुळे, जर्मनी चे एकीकरण होऊन बंद पडले, ते याच वर्षी. २७ वर्षांच्या कारावासातून सुटून 'नेल्सन मंडेला' बाहेर आले ते ही याच वर्षी फेब्रुवारीत. एप्रिल मध्ये स्पेस शटल डिस्कवरी ने प्रचंड मोठा हबल हा टेलिस्कोप अवकाशात प्रस्थापित केला. आणि हे १९९० सरत असताना जन्माला आला एक इतिहास - वर्ल्ड वाईड वेब च्या रूपाने !

मुळात याची सुरुवात झाली होती ती १९८९ च्या मार्च महिन्यातच. सर्न मधील एक शास्त्रज्ञ 'टीम बर्नर्स-ली' याने हायपरटेक्स्ट प्रोटोकोल वापरून माहिती कशी पाठवता येईल याचा आराखडा तयार केला. काही महिन्यांनी सर्न मधील सिस्टम इंजिनीअर 'रोबर्ट कोलिऊ' हा टीम ला जॉईन झाला. आणि इंटरनेट मध्ये वर्ल्ड वाईड वेब चा जन्म झाला.

'टीम बर्नर्स-ली' ने नेक्स्ट या कॉम्प्युटर सिस्टम वर जगातला पहिला ब्राउझर तयार केला. आता जे काय तयार झालं त्याला नाव काय द्यायचं ? त्यांची सुरुवातीची नावं फार बाळबोध होती - ' द माइन ऑफ इन्फोर्मेशन' (माहितीची खाण), 'द इन्फोर्मेशन मेश' (माहितीचे जाळे) . मात्र ती पसंत पडली नाहीत. शेवटी मे १९९० मध्ये नावं ठरले - वर्ल्ड वाईड वेब !

जगातली पहिली वेब साईट

जगातली पहिली वेब साईट तयार करण्याचा मान जातो सर्न कडे. "info.cern.ch" ही जगातली पहिली वेब साईट आहे. आणि मुख्य म्हणजे ती अजूनही 'लाइव' आहे. मात्र गम्मत म्हणजे या वेब साईट च्या मागे 'www" नाही. या साईट चा पूर्ण पत्ता आहे – http://info.cern.ch. आणि जगताला पहिला वेब अड्रेस आहे – http://info.cern.ch/hypertext/www/TheProject.html. या अड्रेस मध्ये माहिती कसली होती, तर वेब पेज कसे तयार करण्यात येते, याची.
आज ८ कोटींच्या पेक्षा जास्त वेब साईटस इंटरनेट वर आहेत. वीस वर्षातली ही प्रगती थक्क करणारी आहे !
प्रशांत पोळ
"मैत्र", ११२६, समाधान हॉस्पिटल च्या बाजूला, राइट टाऊन, जबलपुर - ४८२ ००२ दूरध्वनी - (७६१) ४०० ४०३२ / ४०० ७२३२ मोबाईल - ०९४२५१ ५५५५१ इ-मेल - telemat@airtelmail.in; pp@tepl.com

शुक्रवार, 26 अक्तूबर 2007

Will ships use the canal at such costs?

The basic justification of the Sethusamudram Ship Canal Project (SSCP) is that it will reduce the distance between Kolkata and Tuticorin by 340 nautical miles and between Chennai and Tuticorin by 434 nautical miles, thereby saving for the ships plying between these places both fuel cost and time involved in sailing the additional distance.
This justification will be readily valid if the SSC is a free seaway which ships can sail through without any payment to the project authority.


But the SSC can not be a free seaway… as ships will be allowed to pass through the canal only under regulated pilotage, and pushed /pulled by tugs belonging to the SSCP.
Obviously, even while saving on the cost of fuel, a ship passing through the canal will be expected to make a payment to the SSCP for using the facility.
The likely pilotage charge to be levied by the SSCP has not been made public, but an approximate figure can be guessed by extrapolating similar charges levied by the Chennai and Tuticorin Port at present.


The approach channel to the Chennai port has a length of 7 km. A 36,000 tonne coal ship calling at Chennai has to pay approximately Rs.21.75 a tonne, or a total of Rs.7.83 lakh, as pilotage charges averaging Rs.1.11 lakh per km.
Tuticorin's approach channel is only 2.4 km long and an identical coal ship calling at this port is levied Rs.17 a tonne, or a total of 6.12 lakh, towards pilotage, working out to Rs.3 lakh per km.
(The comparative lower rate per km at Chennai is because the capitol cost of digging the much older channel has been amortised a long time ago.)


The projected length of the Sethusamudram channel is 56 km. Both capital and recurring cost will be much higher for the SSCP than for the Chennai and Tuticorin ports, and its levy of pilotage per km is likely to be substantially higher than that of even the latter if it has to have a 9 per cent return on the capital.


Even if the Chennai rate is assumed, the same ship will have to pay over 60 lakhs to the SSCP for passing through the canal.

But the cost of fuel that will be saved by the same ship by taking the shorter route through the Sethusamudram canal instead of sailing round Sri Lanka will be less than Rs. 7 lakh, which is even less than 1/8 of SSCP's likely levy.
The saving in sailing time for that ship will also be substantially less than the 36 hours projected by the SSCP because the ship can not be towed through the canal at its normal speed through the canal, and the time will also be lost in embarkation/disembarkation of pilots and other inspection procedures. The saving in sailing time of just about a day will not justify the incurring of over 8 times the cost of fuel saved.